पाण्याच्या शोधार्थ हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:00 IST2017-12-28T16:00:19+5:302017-12-28T16:00:32+5:30
मांडवड - नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील खैरमाळ शिवारात पाण्याच्या शोधार्थ कासावीस झालेल्या एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पाण्याच्या शोधार्थ हरणाचा मृत्यू
मांडवड - नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील खैरमाळ शिवारात पाण्याच्या शोधार्थ कासावीस झालेल्या एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील मधुकर सोनवणे यांच्या विहिरीत मृत अवस्थेत हरण असल्याचे त्यांनी लक्ष्मीनगरचे पोलीस पाटील समाधान सोनवणे यांना कळविले. त्यानंतर सोनवणे यांनी वनविभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलविण्यात आले . वनपाल पवार, वनरक्षक सुर्यवंशी, अधिसंख्य दाभाडे व लक्ष्मण पवार यांनी तसेच भैया जाधव व बबलू सोनवणे यांनी विहीरीत पडलेले हरीण बाहेर काढले. या खैरमाळ शिवारात नेहमीच हरणांच्या कळपांचा वावर असतो, मात्र या वर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण खुपच कमी असल्याने नदी धरण किंवा शेताच्या बाजूला असणारे ओहोळांनाा पाणीच राहिले नाही. त्याशिवाय जेमतेम विहिरींना पाणी आहे, त्यांनी ही तळ गाठला आहे. सध्या तर डिसेंबर महिनाच चालू असतांना वन्य प्राण्यांना पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागत आहे. वनविभागाने या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.