पंचवटीच्या तुळजा भवानीनगरमधील इमारतीवरून उडी घेतलेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:33 IST2017-11-04T13:32:47+5:302017-11-04T13:33:06+5:30

पंचवटीच्या तुळजा भवानीनगरमधील इमारतीवरून उडी घेतलेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू
पंचवटी : पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या तुळजा भवानीनगरमधील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ खुशी श्याम पाटील (१५, विजय गॅलेक्सी, तुळजा भवानीनगर, पेठरोड) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि़२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास खुशी पाटील या मुलीने 'विजय गॅलेक्सी' या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील आपल्या घराच्या गॅलरीतून खाली उडी मारली़ यामध्ये गंभीर जखमी झालेली खुशी हिला नातेवाइकांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते़ तिच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़