शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अभोणा उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: September 10, 2016 00:32 IST

अभोणा उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

अभोणा: कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात कांदा विक्रीसाठी आलेल्या आदिवासी शेतकऱ्याचा दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत दबून अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कोसवण (ता. कळवण) येथील ढवळू यशवंत चव्हाण (४२) हे आदिवासी शेतकरी ट्रॅक्टर (एमएच ४१, डी. ३३८५)मधून कांदा घेऊन विक्रीसाठी आले होते. उपबाजार आवारात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागे उभे राहून भ्रमणध्वनीवर बोलत असताना चालकाने (एमएच ४१डी १५५२) ट्रॅक्टर ट्रॉलीसह मागे घेतल्याने शेजारी उभा असलेल्या ट्रालीमध्ये दबून त्यांचा मृत्यू झाला. बाजारातील शेतकरी बांधवांनी त्वरित जखमी शेतकऱ्यास ग्रामीण रु ग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकारी जगदीश चौरे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत अभोणा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ट्रक्टरचालक पंत हिरामण बागुल (३१), रा. कोसवण यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे व सहकारी करीत आहेत. (वार्ताहर)