सैन्य दलातील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू
By Admin | Updated: June 9, 2017 01:24 IST2017-06-09T01:24:22+5:302017-06-09T01:24:39+5:30
सैन्य दलातील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

सैन्य दलातील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील सैन्य दलातील जवान दिगंबर संतोष जाधव (४२) यांचे पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली असून, उद्या दि. ९ जून रोजी सकाळी १० वाजता बिजोटे येथे शासकीय इंतमात अत्यंसस्कार करण्यात येणार आहेत.
जाधव हे २१ वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते. राजस्थानमधील जोधपूर येथे दीर्घकाळ सेवेत होते. सेवाकाळात नायब हवालवार, फोन आॅपरेट्रर आदि सेवा बजावली होती. एक महिन्यापासून त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागल्याने सैन्य दलाच्या पुणे येथील रु ग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.