खडकमाळेगावला उष्माघाताने तरु णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:53 IST2018-04-19T23:53:29+5:302018-04-19T23:53:29+5:30
वनसगाव : तपमानाने उच्चांक ओलांडला असताना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील राहुल केशव रायते (१८) या तरुणाचा उष्माघाताने अंत झाल्याची घटना बुधवारी घडली.

खडकमाळेगावला उष्माघाताने तरु णाचा मृत्यू
वनसगाव : तपमानाने उच्चांक ओलांडला असताना निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील राहुल केशव रायते (१८) या तरुणाचा उष्माघाताने अंत झाल्याची घटना बुधवारी घडली. राहुल कामानिमित्त घराबाहेर गेला होता. दुपारी २ वाजेच्या सुमारास तो उन्हामधून परत आल्यानंतर त्याने थंड पाण्याने अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. अंघोळीनंतर तो काही क्षणात जागेवरच कोसळला.
राहुलला उपचारासाठी तत्काळ वनसगाव येथील डॉ. चंद्रशेखर सातभाई यांच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. राहुलच्या अकस्मात मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. राहुलच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. दरम्यान बुधवारी मालेगाव तालुक्यातही एकाचे उष्माघाताने निधन झाले होते.