एकलहरा वीज केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: October 5, 2015 23:58 IST2015-10-05T23:57:01+5:302015-10-05T23:58:54+5:30
एकलहरा वीज केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू

एकलहरा वीज केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू
नाशिकरोड : एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात सोमवारी पहाटे मशीनच्या वरती बांबू-बल्ल्यांचा पहाड बांधत असताना कंत्राटी कामगार पाय घसरून हाफरमधील पाण्यात बुडून मयत झाला. तर दुसरा कंत्राटी कामगार पोहता येत असल्याने वाचला असून, किरकोळ जखमी झाला आहे.
एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मशीनच्या वरती बांबू-बल्ल्यांचा पहाड बांधण्याचे काम सुरू होते. यावेळी कंत्राटी कामगार लेकचंद बुरकन चौधरी (वय ४५, रा. सामनगाव गावठाण) व लाल मोहन हे दोघे पहाड बांधत असताना पाय घसरल्याने खालील हाफरमधील पाण्यात पडले. लेकचंद चौधरी याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. तर किरकोळ जखमी झालेला लाल मोहन हा पोहता येत असल्याने बाहेर आला. यावेळी इतर कामगारांनी पाण्यात बुडून गंभीर जखमी झालेल्या लेकचंद चौधरी यास त्वरित बाहेर काढून बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तेथे पहाटे त्याचे निधन झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कारागृहातील कैद्याचे निधन
मध्यवर्ती कारागृहातील कैदी तातुराम विठ्ठल महाबळे (वय ५५) हा कर्करोगाने आजारी असल्याने त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्याचे निधन झाले. (प्रतिनिधी)