दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:47 IST2019-05-10T00:47:15+5:302019-05-10T00:47:30+5:30

वणी : दुचाकीने धडक दिल्याने पादचारी वृद्ध इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Death of a biker | दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

ठळक मुद्देगणेश कावळे यांनी पोलिसात तक्रार

वणी : दुचाकीने धडक दिल्याने पादचारी वृद्ध इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कादवा कारखाना ते खेडगाव रस्त्यावर जगन्नाथ पंढरीनाथ कावळे पायी जात होते. दरम्यान, रस्ता ओलांडून शेडनेट मिरचीची पाहणी करण्यासाठी ते जात असताना दुचाकीने (एमएच १५ एफझेड २९३७) जाणाऱ्या वसंत निवृत्ती कावळे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची यांना धडक लागली. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर नाशिकच्या खासगी रु ग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेश कावळे यांनी पोलिसात तक्रार दिल्याने वसंत कावळे यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Death of a biker

टॅग्स :Accidentअपघात