शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डझनभर गावगुंडांचा पोलीस गस्त पथकावर प्राणघातक हल्ला; एक पोलीस गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:04 IST

नाशिक : शहरामध्ये गावगुंडांचा धुडगुस सुरूच असून नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या ...

ठळक मुद्देहजारी हे उपनिरिक्षक योगीता नारखेडे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचले होते.टोळक्याने पोलिसांवर चाल केलीसर्व संशयितांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली आहे

नाशिक : शहरामध्ये गावगुंडांचा धुडगुस सुरूच असून नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या टोळक्याने अंडाभुर्जी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दमबाजी करत त्याच्या वाहनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकावरही टोळक्याने लाकडी दंडुके, लोखंडी फावड्यांनी हल्ला चढविला. पोलिसांना दमबाजी करून त्यांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित हल्लेखोरांना अटकाव करत असताना एका हल्लेखोराने पोलीस कॉन्स्टेबल सागर हजारी (रा.मुख्यालय वसाहत) याच्या डोक्यात लाकडी दंडुका व लोखंडी फावड्याने प्रहार केला. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्त्रावदेखील झाला आहे. हजारी यांच्यावर खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मेंदूच्या नाजूक भाग सुदैवाने शाबुत राहिल्याने रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.नाशिक शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून वाढती गुन्हेगारीने नागरिक त्रस्त झाले आहे. पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गावगुंडांची मजल वाढल्याने संताप व्यक्त होत आहे. हजारी हे उपनिरिक्षक योगीता नारखेडे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचले होते. तरीदेखील टोळक्याने पोलिसांवर चाल केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, दंगल माजविणे, शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन करणे आदि गुन्हे संंशयितांवर दाखल करण्यात आले आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली आहे. यामध्ये काही अल्वयीन असून काही सराईत गुन्हेगार आहेत. सर्व गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टी भागातील आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात