गिरणा नदीपात्रालगत वाळू खदाण ढासळून एक ठार, तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:56 IST2018-09-03T12:55:50+5:302018-09-03T12:56:26+5:30

A dead man collapses sand on the Girna river, three seriously | गिरणा नदीपात्रालगत वाळू खदाण ढासळून एक ठार, तिघे गंभीर

गिरणा नदीपात्रालगत वाळू खदाण ढासळून एक ठार, तिघे गंभीर

मालेगाव- तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीपात्रालगत अवैधरित्या वाळू उपसा करताना खदाण ढासळल्याने त्याखाली पाच जण दबले गेले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भावडू रामचंद्र वाघ (२५) रा रोंझाने ता. मालेगाव असे मृताचे नाव आहे. राकेश शांताराम माळी व भोलेनाथ लालचंद्र माळी ही जखमींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे. दरम्यान सवंदगावच्या संतप्त ग्रामस्थांनी पोलीस व महसुल विरोधात तिव्र संताप व्यक्त केला आहे. येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू होता. वारंवार तक्रार करूनही संबंधित खात्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: A dead man collapses sand on the Girna river, three seriously

टॅग्स :Nashikनाशिक