शिवडे येथील विहिरीत आढळला मृत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 15:09 IST2018-09-22T15:08:36+5:302018-09-22T15:09:10+5:30
सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथील सरपंच विमल हारक यांच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली.

शिवडे येथील विहिरीत आढळला मृत बिबट्या
सिन्नर : तालुक्यातील शिवडे येथील सरपंच विमल हारक यांच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली. शिवडे-सोनांबे रस्त्यावरील गावालगच्या खोल ओहोळ परिसरात हारक यांच्या शेतात विहिर आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने या विहिरीकडे कोणी फिरकले नाही. परिसरातील काही मजूर विहिरीत डोकावले असता त्यांना कुजलेला बिबट्या पाण्यावर तरंगताना दिसला. हारक कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. शुक्रवारी वनविगाच्या कर्मचारी वनपाल पी. के. आगळे, सुचिता राठोड, बाबुराव सदगीर आदिंनी बिबट्याचा मृतदेह बाहेर काढून त्याचा पंचनामा करण्यात आला.