वाघेरा घाटात सापडला मृतदेह

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:11+5:302014-06-14T01:20:23+5:30

एका अनोळखी तरुणाचा मृतदेह वाघेरा घाटात बेवारस स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Dead bodies found in Waghera Ghat | वाघेरा घाटात सापडला मृतदेह

वाघेरा घाटात सापडला मृतदेह

हरसूल : हरसूल-वाघेरा घाटात एका विवाहितेचा खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना ताजी असताना काल दि.१२ जूनला दुपारी पुन्हा एका अनोळखी तरुणाचा मृतदेह वाघेरा घाटात बेवारस स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्येही भीती निर्माण झाली आहे.
वाघेरा घाटात एका बेवारस
तरुणाचा मृतदेह दरीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हरसूल पोलिसांनी वाघेरा घाटातील दरीत जाऊन ग्रामस्तांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो बेवारस मृतदेह हरसूल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची सोय नसल्याने मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनचा अहवाल आला नसल्याने मृत्यू नेमका कशाने झाला हे समजले नव्हते. त्यामुळे हरसूल पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मृत तरुणाचे वय ३० ते ३५, रंग सावळा, सफेद आकाशी हाफ बाहीचा शर्ट, फिकट आकाशी रंगाची जीन्स पॅँट, डाव्या हातावर विजय-योगीता, तर उजव्या हातावर ओम नाव गोंदले असून, उजव्या हाताच्या मनगटावर जुन्या शस्त्रक्रियेचे निशाण, शरीराने मजबूत असे या तरुणाचे वर्णन आहे. वरील वर्णाच्या तरुणाविषयी काही माहिती असल्यास हरसूल पोलीस ठाणे येथे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश आंधळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे. दरम्या शुक्रवारी या
प्रकरणी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Dead bodies found in Waghera Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.