वणीत दिवसाढवळ्या चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:50 IST2020-09-08T22:30:51+5:302020-09-09T00:50:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वणी : कड गल्लीतील हनुमान मंदिरालगत असलेल्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शालिनी कोरडे यांच्या घरातून मंगळवारी सकाळी ४५ हजाराची रोख रक्कम व सुवर्णालंकार चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली आहे.

वणीत दिवसाढवळ्या चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कड गल्लीतील हनुमान मंदिरालगत असलेल्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या शालिनी कोरडे यांच्या घरातून मंगळवारी सकाळी ४५ हजाराची रोख रक्कम व सुवर्णालंकार चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली आहे.
कोरडे या ग्रामीण रुग्णालयात त्या जेवणाचे डबे पुरविण्याचे काम करतात. मंगळवारी सकाळच्या सुमारास जेवणाचे डबे पोहचविण्यासाठी नेहमीप्रमाणे वणी ग्रामीण रुग्णालयात गेल्या होत्या. डबे देऊन त्या घरी परतल्या असता घराच्या दरवाजाची कडी तोडलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी आत प्रवेश केला असता कपाटाचा ड्रॉव्हर तोडलेल्या स्थितीत दिसून आला. सदर प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.