Daulatarao Aher Ashram school team's success in the Taluk level Kabbadi competition | दौलतराव आहेर आश्रम शाळेच्या संघाचे तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत यश
दौलतराव आहेर आश्रम शाळेच्या संघाचे तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत यश

ठळक मुद्दे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली

लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौलतराव अहेर अनुदानीत आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्तम यश संपादन केल्याने या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या क्र ीडा विभागामार्फत रामरावजी आहेर माध्यमिक विद्यालय सुभाष नगर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात डॉ. दौलतराव आहेर आश्रम शाळा विठेवाडी आणि श्री. शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत डॉ. दौलतराव आहेर आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी मराठा इंग्लिश स्कुलचा पराभव केला. यामुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ज्योत्स्ना सूर्यवंशी, पुष्पा देवरे, क्र ीडा शिक्षक वाय. एच. अहिरे, वाय. पी. चौरे, जगदीश कचवे तसेच शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राहूल अहेर, उपाध्यक्ष डॉ. पोपट पगार, चिटणीस कृष्णा बच्छाव, खजिनदार रमेश शिरसाठ, संचालक प्रशांत अहेर, प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 


Web Title: Daulatarao Aher Ashram school team's success in the Taluk level Kabbadi competition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.