त्र्यंबकेश्वरला दत्तजयंती ठिकठिकाणी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:06 IST2020-12-29T19:16:21+5:302020-12-30T00:06:31+5:30
त्र्यंबकेश्वर : श्री दत्तजयंती निमित्त त्र्यंपकेश्वर गावात ठिकठिकाणी धामिर्क व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले.

त्र्यंबकेश्वरला दत्तजयंती ठिकठिकाणी साजरी
त्र्यंबकेश्वर : श्री दत्तजयंती निमित्त त्र्यंपकेश्वर गावात ठिकठिकाणी धामिर्क व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले.
यावेळी प्रत्येक मंडळाने विविध उपक्रम साजरे आले. मंदिरवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गावातील पाचआळी येथील कै.नामदेव देशमुख (पाळेकर) यांच्या घराण्यातील एकमुखी दत्त मंदीराचा जयंती सोहळा कैलास देशमुख, श्रीपाद देशमुख, ललिता शिंदे, संदीप शिंदे आदी परिवारातर्फे एकमुखी दत्त मंदिरात जयंती साजरी करण्यात आली. परिवहन महामंडळाच्या बसस्थानक येथे असलेल्या दत्ताच्या मुर्तीची विधीवत पुजा करण्यात आली.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्र्यंबक नगरपरिषदेच्या अमृतकुंभ या भक्त निवासच्या खाली असलेल्या उंबराच्या झाडाजवळील मुर्तीची पुजा करण्यात आली. यावेळी मंडळातर्फे प्रसाद वाटप करण्यात आले. भास्कर सोनवणे, नबीयुन शेख, कैलास अडसरे, राउत, रामभाऊ परदेशी, मोरे, रमेश कदम, रविंद्र गंगापुत्र आदींनी जयंती सोहळ्यात सहभाग घेतला.(२९ त्र्यंबक)