नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, अस्वली स्टेशन, जानोरी आदी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नांदूरवैद्य येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महिलांनी दत्तजन्मपर पाळणा सादर करत भाविकांना मंत्रमुग्ध केले.तालुक्यातील नांदूरवैद्य येथे दत्तजन्मोत्सवानिमित्त नामदेव महाराज डोळस यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस प्रभू दत्तात्रेयांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन पूजन करण्यात आले. यानंतर कीर्तनकार डोळस यांनी भगवान दत्तअवतारापासून त्यांनी केलेल्या लीलांचे वर्णन केले. त्यानंतर, सामूहिक आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
इगतपुरीच्या पूर्व भागात दत्तजन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:20 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, अस्वली स्टेशन, जानोरी आदी परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत दत्तजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नांदूरवैद्य येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महिलांनी दत्तजन्मपर पाळणा सादर करत भाविकांना मंत्रमुग्ध केले.
इगतपुरीच्या पूर्व भागात दत्तजन्मोत्सव
ठळक मुद्देनामदेव महाराज डोळस यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.