दत्तमंदिररोड, आनंदनगर  भागात अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:46 IST2019-04-26T00:46:26+5:302019-04-26T00:46:50+5:30

दत्तमंदिररोड, आनंदनगर, आर्टिलरी सेंटररोड या भागातील काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

 Datamandir Road, the kingdom of darkness in Anandnagar region | दत्तमंदिररोड, आनंदनगर  भागात अंधाराचे साम्राज्य

दत्तमंदिररोड, आनंदनगर  भागात अंधाराचे साम्राज्य

नाशिकरोड : दत्तमंदिररोड, आनंदनगर, आर्टिलरी सेंटररोड या भागातील काही ठिकाणी पथदीप बंद असल्याने सायंकाळनंतर त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दत्तमंदिररोड, आनंदनगर, मनपा शाळा १२५ चे क्रीडांगण, आर्टिलरी सेंटररोड, जैन भवन आदी भागातील काही ठिकाणचे पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. काही पथदीप संध्याकाळी सुरू होऊन मध्यरात्रीपूर्वी बंद पडतात. आर्टिलरी सेंटर रोडवरील काही पथदीप झाडांच्या फांद्यांमध्ये लपून गेल्याने त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे मनपा शाळा १२५ क्रीडांगणावर फिरणाऱ्यांची व खेळणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मात्र पथदीपाचा बंद-सुरूचा खेळ सुरू असल्याने फिरायला व खेळण्यास येणाºयांना अडचण निर्माण होत आहे. पथदीपाचे बल्ब खराब झाल्याने त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे त्या भागातील रहिवासी विशेष करून महिला व वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
मनपा विद्युत विभागाकडे तक्रार करूनदेखील साहित्य नाही, लाईट चालू जातील अशी थातूरमातूर उत्तरे दिली जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. बंद पथदीपांमुळे अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने गैरप्रकार वाढले आहेत. नगरसेवक व मनपा विद्युत विभागाने लक्ष देऊन बंद पडलेले पथदीप सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Web Title:  Datamandir Road, the kingdom of darkness in Anandnagar region