दसाना लघुप्रकल्प तुडुंब

By Admin | Updated: August 7, 2014 02:02 IST2014-08-07T00:54:11+5:302014-08-07T02:02:15+5:30

दसाना लघुप्रकल्प तुडुंब

Dashan Minor Project Tumumba | दसाना लघुप्रकल्प तुडुंब

दसाना लघुप्रकल्प तुडुंब


सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ होऊन बुधवारी पहाटे हरणबारी धरणाबरोबरच दसाना लघुप्रकल्प तुडुंब भरून मोसम व हत्ती नदीला पूर आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बागलाण तालुक्यातील सुमारे ११६६ दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हरणबारी हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणावर बागलाण तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील १२० गावांचा सिंचन व पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने काल पहाटे हरणबारी धरण तुडुंब भरले. सांडव्यामधून सुमारे साडेपाचशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीला पूर आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Dashan Minor Project Tumumba