दसऱ्याचा बाजार संपला अन रविवार कारंजा चौकाला कचऱ्याचा पडला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 23:10 IST2017-09-30T23:09:23+5:302017-09-30T23:10:40+5:30
दसऱ्याला सोने म्हणून तशी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. मात्र आपटा शहरात केवळ शंभर झाडांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. आपट्यासारखी दिसणारी कांचन वर संक्रात दरवर्षी विजयादशमी ला ओढावते.

दसऱ्याचा बाजार संपला अन रविवार कारंजा चौकाला कचऱ्याचा पडला विळखा
नाशिक : नाशिकमधील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या रविवार कारंजा परिसरात दोन दिवसांपासून दसऱ्याच्या बाजार बहरला होता. असंख्य विक्रेत्यांनी कांचन, अशोक च्या झाडांच्या फांद्याच्या फांद्या विकण्यासाठी आणल्या होत्या. दसऱ्याच्या मुहूर्तावर फांद्याची पाने विकली मात्र दसऱ्याचा सूर्यास्त होताच फांद्यांचा ढीग तसाच रस्त्यावर फेकून घर गाठले. यामुळे चौक कचऱ्याचा बनला मात्र निसर्ग अन पर्यावरणाची हानी झाली.
दसऱ्याला सोने म्हणून तशी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. मात्र आपटा शहरात केवळ शंभर झाडांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. आपट्यासारखी दिसणारी कांचन वर संक्रात दरवर्षी विजयादशमी ला ओढावते. कांचन ची शेकडो झाडे ओरबाडली जातात. अन फांद्या बाजारात येतात. याबरोबरच घरांवर, वाहनांवर घालण्यासाठी फुलांची माळा लागते., त्या तयार करण्यासाठी 'अशोक' ओरबाडला जाऊ लागला आहे. अशोक ची देखील तोड होऊ लागली आहे. महापालिका हद्दीत हे विदारक चित्र दिसत असल्याने वृक्ष प्राधिकरण समिती यावर काय उपाययोजना करणार याकडे लक्ष लागले आहे