दसाणे लघुप्रकल्प ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:18 IST2020-07-10T21:46:02+5:302020-07-11T00:18:18+5:30
सटाणा : तालुक्यातील दसाणे येथील लघुप्रकल्प यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लोमुळे कान्हेरी नदी दुथडी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दसाणे लघुप्रकल्प ओव्हर फ्लो
सटाणा : तालुक्यातील दसाणे येथील लघुप्रकल्प यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लो झाला आहे. प्रकल्प ओव्हर फ्लोमुळे कान्हेरी नदी दुथडी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दसाणे लघुप्रकल्पाची ११० दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने गेल्या दहा वर्षांनंतर यंदा प्रथमच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. कान्हेरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दसाणे, केरसाणे, वीरगाव, डोंगरेज, वनोली, तरसाळी, औंदाणे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होते. तसेच परिसरातील बहुतांश गावाच्या पाणीपुरवठा योजना याच नदीवर असल्याने या पाण्यामुळे पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.