शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षकाला हुलकावणी देत कंपनीत पाच लाखांची धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:07 IST

सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत कंपनीतील पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देसातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत चोरीचोरट्यांनी लांबवली पाच लाख रुपयांची रोकडसीसीटिव्ही बंद करून रोकडेसह तिजोरीच केली गायब

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स कंपनीत गुरुवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत कंपनीतील पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना समोर आली आहे. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी कंपनीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन डिव्हीआर व हार्डडिस्क सोबत घेऊन जात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे कंपनी परिसरात २४ तास सुरक्षारक्षक नेमलेला असताना ही धाडसी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीत उज्वल भारत नावाचा कारखाना आहे. या कारखान्यांतर्गत एमडी ट्रेडर्सचे काम चालते. प्लास्टिक प्रिंटिंगसह पोल्ट्री व्यवसायाला लागणारे खाद्य (ट्रेडिंग) आणि ब्रॉइलर कल्ल बर्डस या कंपनी मार्फत पुरवली जाते. कंपनीचे संचालक दीपक आव्हाड नेहमीप्रमाणे कंपनीचे कामकाज आटोपून गुरुवारी (दि.२४) रात्री ८ वाजता घरी गेले होते. शुक्रवारी सकाळी कंपनीत गेले असता ऑफिसमधील लॉकर व त्यातील पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. यावेळी कंपनी परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे उलट्या दिशेने फिरवलेले तर काही कॅमेऱ्यांचे कनेक्शन तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. विशेष म्हणजे ऑफिसमध्ये दोन लॅपटॉप असतांना त्यांना हात न लावता तसेच कुठल्या प्रकारची तोडफोड न करता ही चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे यांच्यासह फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून कंपनीच्या मागील बाजूतील खिडकीतून तिजोरी फेकून चोरट्यांनी पलायन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कंपनीचे संचालक दीपक आव्हाड यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसtheftचोरी