दरेगावला शेतीच्या वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 15:49 IST2021-05-22T15:49:28+5:302021-05-22T15:49:40+5:30
चांदवड : तालुक्यातील दरेगाव येथे शेतीच्या सामाईक बांधावरील दगड बाजुला केल्याचे कारणावरुन दोन कुंटूबात झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले.

दरेगावला शेतीच्या वादातून हाणामारी
चांदवड : तालुक्यातील दरेगाव येथे शेतीच्या सामाईक बांधावरील दगड बाजुला केल्याचे कारणावरुन दोन कुंटूबात झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले. या प्रकरणी रामचंद्र म्हसू अहिरे रा. दरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फुलचंद म्हसु अहिरे , समाधान म्हसु अहिरे, सुनील म्हसु अहिरे, अक्काबाई म्हसु अहिरे सर्व रा. दरेगाव यांनी शेत गट नंबर ३१० मधील सामाईक बांधावरील दगड बाजुला केल्याचे कारणावरुन रामचंद्र अहिरे यांचा मुलगा रविंद्र हा फुलचंद अहिरे विचारपुस करण्यास गेला असता त्यांचा राग आला. वरील सर्वानी त्याला शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही बाब मुलाने वडील रामचंद्र अहिरे यांना सांगताच त्यांनी विचारणा केली असता समाधान म्हसु अहिरे यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने रामचंद्र अहिरे यांचे डोके फोडले. तर अक्काबाई यांनी गजाने त्यांच्या खांद्यावर व पाठीवर मारहाण करुन दुखापत केली. रामचंद्र यांचा मुलगा रविंद्र व केशव हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनापण लोखंडी गजाने व काठीने मारहाण करुन जबर जखमी केले. रामचंद्र अहिरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम.पी. बागुल तपास करीत आहेत.