मालेगावी पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:31 IST2018-11-15T18:30:53+5:302018-11-15T18:31:23+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांप्रश्नी येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मालेगावी पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन
मालेगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांप्रश्नी येथील तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसिलदार ज्योती देवरे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ईपीएस ९५ योजनेतुन मिळणारी पेन्शन ही तुटपुंज्य आहे. १८६ उद्योगातुन कामगार अधिकारी यांना या योजनेखाली पेन्शन मिळते.
डॉक्टर कोशीयारी समितीच्या अहवालानुसार महागाई भत्ता मिळावा, उच्च वेतन उच्च पेन्शन देण्यात यावी, सन २००९ ते २०१६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांना फरक देण्यात यावा, अन्न सुरक्षेचा कायदा लागू करावा, पेन्शनर्सला आरोग्य सेवा मोफत देण्यात यावी आदि मागण्यांप्रश्नी धरणे आंदोलन करण्यात आली. या आंदोलनात सुधाकर गुजराती, बापु रांगणेकर, शिवाजी धोबडे, सुभाष शेळके, अशोक अहिरे, उद्धव खैरनार आदिंसह पेन्शनधारक सहभागी झाले होते.