मालेगावी कृषी अधिकाऱ्यांचे धरणे

By Admin | Updated: August 13, 2014 00:39 IST2014-08-12T23:49:58+5:302014-08-13T00:39:36+5:30

मालेगावी कृषी अधिकाऱ्यांचे धरणे

Dare of Malegavi agricultural officers | मालेगावी कृषी अधिकाऱ्यांचे धरणे

मालेगावी कृषी अधिकाऱ्यांचे धरणे

मालेगाव - कृषी विभागाच्या तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघातर्फे १४ आॅगस्टपर्यंत हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी सुधारित वेतनश्रेणी व दर्जा वाढवून मिळावा, १ जुलै २००१ चा विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करावा, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई देण्यासाठी १६ जुलै १९८३ची कार्यप्रणाली राबवावी आदि स्वरूपाच्या मागण्या केल्या आहेत. आंदोलनात तालुकाध्यक्ष सुनील सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व सभासद सहभागी झाले आहेत.

Web Title: Dare of Malegavi agricultural officers