ताहाराबाद रस्त्यावर धोकेदायक झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:32 IST2019-01-22T13:31:22+5:302019-01-22T13:32:25+5:30
जायखेडा : औरंगाबाद अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद ते नामपूर दरम्यान अनेक झाडे मर रोगांच्या प्रादुर्भावने वाळली आहेत. रस्ताकडेला असलेली ही वाळलेली झाडे अत्यंत धोकादायक ठरत आहेत.

ताहाराबाद रस्त्यावर धोकेदायक झाडे
जायखेडा : औरंगाबाद अहवा राज्यमार्गावर ताहाराबाद ते नामपूर दरम्यान अनेक झाडे मर रोगांच्या प्रादुर्भावने वाळली आहेत. रस्ताकडेला असलेली ही वाळलेली झाडे अत्यंत धोकादायक ठरत आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदर झाडे तोडून टाकावी, अशी मागणी वाहन चालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे. ताहाराबाद, जायखेडा, नामपूर रस्त्यालगत रोगट हवामान, रासायनिक खते किटकनाशके यांचा होणारा अतिरिक्त वापर, बदलते निसर्गचक्र यामुळे गेल्या काही वर्षापासून कडूनिम्ब, आंबा, बाभुळ आदी प्रजातींच्या झाडांना मर रोगाने ग्रासले आहे. तर काही जुनी वयस्कर झाडे वाळलेली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक झाडे पूर्णपणे निष्पर्ण होऊन उभी आहेत. त्यामुळे वाळलेली झाडे केव्हा उन्मळुन पडतील याचा भरवसा नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताचा धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी जायखेडा ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे, ग्रा.प.सदस्य, तसेच सचिन कोठावदे, यशवंत पवार, नारायण सावंत, प्रवीण सावंत, सुरेश कंकरेज, शरद पवार, आधार खैरनार, यशवंत पवार, नीलेश पवार, नीलेश कांकरिया, अतुल चित्ते, आदींनी केली आहे.