शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

वापरून कचऱ्यात फेकलेले मास्क ठरताय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 6:58 PM

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परीसरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार परीसरात वाढत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देफेकलेले मास्क रस्त्यालगत व कचरा कुंड्यांच्या स्वरुपात सर्वत्र ढीगाने पसरलेले

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परीसरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार परीसरात वाढत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.फेकलेले मास्क रस्त्यालगत व कचरा कुंड्यांच्या स्वरुपात सर्वत्र ढीगाने पसरलेले दिसत आहेत. हे वापरलेले मास्क परीसरात राहणाऱ्या नागरिकांना अत्यंत धोक्याचे ठरत आहेत. शिवाय कचऱ्यातील हे मास्क परीसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी जी त्रिसूत्री घालून दिली आहे. त्यात मास्कचा वापर अपरिहार्य ठरला आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क वापरून झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला किंवा कचऱ्याबरोबर फेकून देतात. त्यामुळे टाकलेला हा कचरा घरगुती कचऱ्यात मिसळला जातो. त्याला हाताळण्यातून संसर्गही होऊ शकतो.मास्कचा वापर नागरिक करतात, ही चांगली बाब असली, तरी त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत त्यांना माहिती नाही. नागरिकांनी वापरलेल्या मास्कची असुरक्षित पद्धतीने हाताळणी धोकादायक ठरू शकते. नागरिकांना मास्कची शास्त्रोक्त विल्हेवाट लावता येत नसली, तरी रस्त्यावर टाकू नये अथवा घरगुती कचऱ्यातच टाकून देऊ नये. त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.- डॉ. कल्पना सहाणे, साकूर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य