वापरून कचऱ्यात फेकलेले मास्क ठरताय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:59 IST2021-04-14T18:58:30+5:302021-04-14T18:59:56+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परीसरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार परीसरात वाढत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

फेकलेले मास्क रस्त्यालगत व कचरा कुंड्यांच्या स्वरुपात
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परीसरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार परीसरात वाढत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
फेकलेले मास्क रस्त्यालगत व कचरा कुंड्यांच्या स्वरुपात सर्वत्र ढीगाने पसरलेले दिसत आहेत. हे वापरलेले मास्क परीसरात राहणाऱ्या नागरिकांना अत्यंत धोक्याचे ठरत आहेत. शिवाय कचऱ्यातील हे मास्क परीसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी जी त्रिसूत्री घालून दिली आहे. त्यात मास्कचा वापर अपरिहार्य ठरला आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क वापरून झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला किंवा कचऱ्याबरोबर फेकून देतात. त्यामुळे टाकलेला हा कचरा घरगुती कचऱ्यात मिसळला जातो. त्याला हाताळण्यातून संसर्गही होऊ शकतो.
मास्कचा वापर नागरिक करतात, ही चांगली बाब असली, तरी त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत त्यांना माहिती नाही. नागरिकांनी वापरलेल्या मास्कची असुरक्षित पद्धतीने हाताळणी धोकादायक ठरू शकते. नागरिकांना मास्कची शास्त्रोक्त विल्हेवाट लावता येत नसली, तरी रस्त्यावर टाकू नये अथवा घरगुती कचऱ्यातच टाकून देऊ नये. त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
- डॉ. कल्पना सहाणे, साकूर.