वडाळा-डीजीपीनगर रस्त्याची सुरक्षितता धोक्यात

By Admin | Updated: May 11, 2014 00:09 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:09:27+5:30

मृत्यूचा सापळा : धोक ादायक वळणांमुळे घडताहेत अपघात

The danger of safety of Wadala-DGP Nagar road | वडाळा-डीजीपीनगर रस्त्याची सुरक्षितता धोक्यात

वडाळा-डीजीपीनगर रस्त्याची सुरक्षितता धोक्यात

मृत्यूचा सापळा : धोक ादायक वळणांमुळे घडताहेत अपघात
वडाळागाव : नाशिक-पुणे व मुंबई महामार्गांना जवळून जोडणार्‍या वडाळा-डीजीपीनगर कॅनॉलरोडला सुरक्षा कवचाची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. रस्त्याला असलेली धोकेदायक तीव्र वळणे, विविध उपनगरीय वसाहतींमध्ये जाणारे जोड रस्ते, अशा अनेकविध बाबींमुळे सदर रस्त्यावर विविध अपघात प्रवण स्थळ आहे. त्यामुळे सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, रस्त्याची सुरक्षितता मागील काही वर्षांपासून धोक्यात आली आहे.
जवळचा व उत्कृष्ट अवस्थेतील रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वडाळा-डीजीपीनगर-साईनाथनगर रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. रस्त्याचे डांबरीकरण चांगले असल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्यामुळे अनेकदा अपघातांच्या घटनांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सदर रस्त्याला सुरक्षितता बहाल करण्यासाठी महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे रस्त्याची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
रस्त्याला विविध ठिकाणी असलेली पाच ते सहा नागमोडी अपघाती वळणे, जोडरस्ते, चौफुल्या, टी-पॉइंट यामुळे अपघात घडतात. कॅनॉल रस्त्याला जोडणार्‍या अंतर्गत कॉलन्यांच्या रस्त्यांच्या प्रारंभी लावण्यात आलेले विविध व्यवसायिकांचे दिशादर्शक, जाहिरात फलक तातडीने हटवावीत कारण जोड रस्त्यांवरून मुख्य कॅनॉल रस्त्यावर येणारी वाहने वाहनचालकांना नजरेस पडत नाही त्यामुळे गोंधळ उडतो. रस्त्यावरील बंद पडलेले पथदीप तातडीने दुरुस्त करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन दिवे लावण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

Web Title: The danger of safety of Wadala-DGP Nagar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.