गोदाकाठावरील पुराचा धोका टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:26 IST2020-06-07T21:43:59+5:302020-06-08T00:26:02+5:30
पूरपरिस्थितीचा धोका टाळण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर वक्राकार गेटची संख्या वाढविण्यासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वक्र ाकार गेट कुठे आणि कसे बसवता येतील याची पाहणी गोदावरी विकास महामंडळचे संचालक एन. व्ही. शिंदे यांनी केली.

नांदूरमधमेश्वर धरणाच्या प्रस्तावित वक्र ाकार गेटच्या जागेची पाहणी करताना एन. व्ही. शिंदे, दिलीप बनकर आदी.
सायखेडा : गोदावरी नदीला दरवर्षी पूर येतो. यामुळे पुराचा सर्वाधिक फटका गोदाकाठ भागातील नागरिकांना बसतो. गंगापूर आणि दारणा नदीतून येणारा पाण्याचा वेग वा क्षमता प्रचंड प्रमाणात असल्याने नांदूरमधमेश्वर धरणावर असलेल्या अपुऱ्या गेटमुळे अथवा नदीत साचलेल्या गाळामुळे पाणी लवकर सखोल भागात शिरते. त्याचा सर्वाधिक फटका शेती व तेथील नदीकाठच्या गावांना बसतो. त्यामुळे पूरपरिस्थितीचा धोका टाळण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणावर वक्राकार गेटची संख्या वाढविण्यासाठी ५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वक्र ाकार गेट कुठे आणि कसे बसवता येतील याची पाहणी गोदावरी विकास महामंडळचे संचालक एन. व्ही. शिंदे यांनी केली. यावेळी आमदार दिलीप बनकर, मुख्य कार्यकारी अभियंता व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी वक्र ाकार गेटची संख्या वाढवणे हे दोन पर्याय असल्याने आमदार दिलीप बनकर यांनी विधानसभा अधिवेशनात जलसंपदा विभागाकडून ५४ कोटी रु पयांचा निधी मंजूर करून आणला होता. या निधीचा विनियोग करण्यासाठी प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, राजेंद्र कुठे, हेमंत दळवी, विजय कारे, वसंत जाधव, गणपत हाडपे, दत्तू मुरकुटे, धोंडीराम रायते, नंदू सांगळे, बापू गडाख आदी उपस्थित होते.
नांदूरमधमेश्वर धरणावर २००८ साली आठ वक्र ाकार गेट बसविण्यात आले होते, मात्र धरणात साठलेला गाळ नदीपात्राची क्षमता कमी झाल्याने दरवर्षीच गोदावरी नदीला पूर येतो. पुराचा सर्वाधिक फटका नदीकाठच्या गावांना बसतो.