शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

बंग दांपत्याला देणार डी. लिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:36 IST

समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली.

मुंबई : समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली.विद्यापीठाच्या अधिसभेचे आयोजन येथील बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस येथे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गिरीश महाजन होते. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.अध्यक्षीय मनोगतात गिरीश महाजन म्हणाले की, दुर्गम आदिवासी भागांमध्ये तीन दशकांपासून अधिक काळ सेवा देणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना सन्माननीय डी. लिट पदवी विद्यापीठातर्फे प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठातर्फे संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून याचा विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सोडविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी मोबाईल अ‍ॅप व एम.यू.एच.एस. हेल्थ सायेन्सेस रिव्हयू या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायंटिफीक जर्नलचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मिलिंद देशपांडे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी संचलनकेले.कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, या अर्थसंकल्पात संशोधनाला चालना मिळण्यासाठी विद्यापीठाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत योजना आहेत.विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना, विविध कल्याणकारी योजना,शिक्षक व विद्याथ्र्यांसाठी व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण, विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय मार्गदर्शन, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना तसेच विकास कामांसाठी भरघोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे प्रारंभी डॉ. संदेश मयेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.५७५.१५ लाखांच्या तुटीचा अर्थसंकल्पविद्यापीठाचा सन २०१९-२०चा अर्थसंकल्प तीन प्रकारात विभागला आहे. अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित अपेक्षित उत्पन्न रु . २१,३५३.८५ लाख तर एकत्रित खर्च रु पये २१,९२९.00 लाख अपेक्षित आहे. ५७५.१५ लाख रुपयांची वित्तीय तूट दाखविण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना परदेशात प्रशिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी परदेशात प्रशिक्षणासाठी जातील त्यांना आर्थिक मदत केली जाईल यासाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.ई- ग्रंथालयामध्ये जास्तीत जास्त पुस्तके व जर्नल इलेक्ट्रॉनिक्स स्वरु पात उपलब्ध असावीत तसेच ही जर्नल्स पुस्तकांबरोबरच देण्यात यावीत यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात ाली आहे.मुख्यालयाचा होणार विस्तारविद्यापीठाच्या मुख्यालयाचा अधिक विस्तार करण्यासाठी आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरपी या तीन विद्याशाखांची स्वत:ची महाविद्यालये असावीत यासाठी शासनास या महाविद्यालयांच्या बांधकामाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :universityविद्यापीठGirish Mahajanगिरीश महाजनAbhay Bangअभय बंग