दिंडोरीत रंगला बालमहोत्सव

By Admin | Updated: April 30, 2017 00:33 IST2017-04-30T00:33:27+5:302017-04-30T00:33:35+5:30

दिंडोरी येथील राजे मंगल कार्यालयात ‘तंबाखूला दे धक्का’ या बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Dandori Rangala Balamohotsav | दिंडोरीत रंगला बालमहोत्सव

दिंडोरीत रंगला बालमहोत्सव

 दिंडोरी : सलाम मुंबई फाउंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने व एव्हरेस्ट फाउंडेशन व राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने दिंडोरी येथील राजे मंगल कार्यालयात ‘तंबाखूला दे धक्का’ या बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटनाप्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त पी. बी. पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी, पंचायत समिती सभापती एकनाथ गायकवाड, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, अनिल सुकेणकर, एव्हरेस्ट कंपनीचे सुशील मल्होत्रा, संदीप देशमुख, पंचायत समिती सदस्य संगीता गिसाडे, बेबीताई सोळसे, कैलास पाटील, गटशिक्षणाधिकारी एस. एस. घोलप, विस्तार अधिकारी डी. डी. देवरे, बी. एस. पवार, के. पी. सोनार, रामनाथ घिसाडे आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मडकीजांब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सानिका वडजे, दिव्या गायकवाड या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. सलाम मुंबई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांच्या चमूने नृत्य सादर केले. सलाम मुंबई फाउंडेशनच्या प्रमुख राजश्री कदम यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्च देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या श्रीमती पी. बी. पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी व पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कथार यांनी मनोगत व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
दुपारच्या सत्रात बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी उपसभापती वसंत थेटे, गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, सलाम मुंबईच्या राजश्री कदम, गटशिक्षणाधिकारी श्रीमती एस. एस. घोलप, पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस कल्याणराव आवटे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी बेडसे यांनी मार्गदर्शन केले. राजे पार्क मंगल परिसराचे आनंदवाडी असे नामकरण करण्यात येऊन एक प्रकारे कल्पनेतले गाव कसे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात गाव व्यसनमुक्त असल्यास त्याठिकाणी कशाप्रकारे गावातील व्यवस्था असेल हे दाखविले गेले. आदर्श शाळा, पोस्ट कार्यालय, गावातील ग्रामपंचायत कार्यालय कशा असल्या पाहिजे हे प्रात्यक्षिकांसह दाखविण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनच्या वतीने तंबाखू सेवनाच्या वाईट परिणामांबद्दल माहिती देणार्या विविध मनोरंजनाच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दिंडोरी तालुक्यातील केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व जनता इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशनच्या प्रमुख राजश्री कदम,गटशिक्षणाधिकारी सौ.एस.एस.घोलप,विस्तार अधिकारी डी.डी.देवरे, बी.एस.पवार, के.पी.सोनार, सर्व केंद्र प्रमुख सलाम मुंबई फाउंडेशनचे दिपक पाटील , अदिती पारेख , विवेक वाबळे, निर्जर बर्वे, संजय ठाणगे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्र माचे सूत्रसंचलन श्रीम.अनुराधा तारगे, श्रीम.निता महाजन यांनी तर आभार गटशिक्षणाधिकारीसौ.एस.एस.घोलप यांनी मानले.

Web Title: Dandori Rangala Balamohotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.