शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला दांडियाची धूम

By admin | Updated: September 28, 2014 22:44 IST

तरुणाईचा उत्साह : रावण दहनाची जय्यत तयारी

 कळवण :  नवरात्र उत्सव, तारुण्याचा सळसळता उत्साह, लाल, पिवळ्या, हिरव्या, केशरी अशा विविध रंगाच्या कपड्यांनी झालेले कलरफूल वातावरण आणि बेफाम, बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई असे दृश्य कळवणसारख्या आदिवासी भागातील शहरात बघावयास मिळत आहे.नवरात्र उत्सवात दांडियाचा उत्सव द्विगुणीत व्हावा, कळवणकर जनतेला त्यात सहभागी करून घेता यावे या हेतूने छत्रपती शिवाजीनगर कला-क्र ीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ व आदर्श सोशल ग्रुपने गेल्या वर्षापासून कळवण शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मैदानावर दांडिया रासचे आयोजने केले असून, शहरातील व परिसरातील शेकडो तरुण यात सहभागी होत आहेत. कळवण शहरात नवदुर्गा फ्रेंडस सर्कल, विठ्ठल मंदिर लेन, दुर्गामाता नवरात्र मित्रमंडळ, सप्तशृंगी देवी नवरात्र मित्रमंडळ, शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ, दुर्गा मित्रमंडळ, माता फुलाबाई चौक नवरात्र उत्सव मंडळ, माता मित्रमंडळ आदि मंडळांच्या माध्यमातून नवरात्र उत्साहात साजरा केला जात आहे, नवरात्र उत्सवातील भारनियमन यंदाच्या वर्षी न झाल्याने उत्साह द्विगुणीत झाला आहे. गांधी चौकातील कुलस्वामिनी अंबिका देवी मंदिर, गणेशनगरमधील श्री दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सव धार्मिक व मंगलमय वातावरणात विविध कार्यक्र मांचे आयोजन करून साजरा केला जात आहे कळवण शहरातील युवक, युवती यांच्याबरोबर बाल-गोपाळदेखील गरबा, टिपरी नृत्य करण्यास आदर्शच्या दांडिया रासमध्ये हजेरी लावत आहे. दांडियासाठी आकर्षक रोषणाई केल्याने रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघत आहे. (वार्ताहर)