रात्री बारापर्यंत रंगला दांडिया ; तरुणाईच्या उत्साहाला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:37 AM2018-10-17T00:37:31+5:302018-10-17T00:37:53+5:30

नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता.

 Dandiya to dusk; The excitement of youthfulness | रात्री बारापर्यंत रंगला दांडिया ; तरुणाईच्या उत्साहाला उधाण

रात्री बारापर्यंत रंगला दांडिया ; तरुणाईच्या उत्साहाला उधाण

googlenewsNext

नाशिक : नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता.  नवरात्रोत्सवानिमित्त शहर व परिसरात सार्वजनिक मंडळांनी दहादिवसीय विविध दांडिया उत्सव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंचवटी, जुने नाशिकसह गंगापूररोड सिडको, इंदिरानगर भागात दांडिया रास, गरब्याचा सांस्कृतिक उत्सव सोहळा रंगलेला पहावयास मिळत आहे. मंगळवारी तरुणाईच्या उत्साह ओसंडून वाहताना दिसून येत होता. पारंपरिक पोशाख परिधान करून तरुण-तरुणींकडून जल्लोषपूर्ण वातावरणात ठिकठिकाणी दांडिया व गरब्याचा आनंद लुटला गेला. बुधवारी (दि.१७) रास दांडियाचा समारोप होणार असून सार्वजनिक उत्सवाची सांगता होईल.
गुरुवारी सर्वत्र विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तरुणाईचा उत्साह सळसळता होता. सर्वच ठिकाणी गरबा, दांडियाचा आनंद घेण्यासाठी गर्दी लोटली होती. त्यामुळे गरब्याचा सामूहिक खेळ चांगलाच रंगात आल्याचे दिसून आले. सर्वत्र आनंद, उत्साह आणि दांडिया, गरबा नृत्याची धम्माल नजरेस पडत आहे. संध्याकाळी सात वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया, गरबा नृत्याचा तरुणाईने गरब्याचा आनंद लुटला. जुने नाशिक, सिडको, गंगापूररोड, इंदिरानगर, पंचवटी, कॉलेजरोड आदी भागांमध्ये सार्वजनिकरीत्या दांडिया व गरब्याचा सोहळ्याला रंग चढला होता.
पंचवटी, मखमलाबादमध्ये धम्माल
पंचवटीमधील कच्छी लोहाणा महाजनवाडी, आई सप्तशृंगी मित्रमंडळ, ओम साई कला क्रीडा मंडळ, दुर्गा फ्रेण्ड सर्कल, दत्ता मोगरे बहुद्देशीय संस्था, सरदार चौक मित्रमंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, अयोध्यानगरी सांस्कृतिक मंडळ, नवीन आडगावनाका मित्रमंडळाच्या वतीने दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गर्दी पहावयास मिळाली. मखमलाबाद गावातील स्थानकावर नवरात्रोत्सव छत्रपती बॉईज ग्रुपच्या वतीने साजरा केला जात आहे. या ठिकाणी दांडिया-गरब्याची रात्री उशिरापर्यंत धम्माल पहावयास मिळाली. ग्रामीण भागाचा बाज टिकून असल्यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.
इंदिरानगरला महिलांनी धरला ठेका
इंदिरानगर परिसरात महिलांसाठी खास रथचक्र चौकातील अजय मित्रमंडळ, चेतनानगरला बाजीराव फाउंडेशनच्या वतीने रास दांडिया खेळला जात आहे. मागील दहा दिवसांपासून या ठिकाणी परिसरातील महिलांकडून सामूहिक गरबा नृत्याचा आनंद लुटला जात आहे. मंगळवारी रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत महिलांनी ठेका धरत धम्माल केली.

Web Title:  Dandiya to dusk; The excitement of youthfulness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.