दांडिया स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By Admin | Updated: October 29, 2015 23:12 IST2015-10-29T22:47:51+5:302015-10-29T23:12:01+5:30

दांडिया स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Dandiya contest prize distribution | दांडिया स्पर्धेचे पारितोषिक वितरण

दांडिया स्पर्धेचे पारितोषिक वितरण

नाशिकरोड : जेलरोड, पंचक येथील समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडिया व विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले.
समर्थ सेवा मंडळाच्या वतीने पंचक शनिमंदिर पटांगणात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात दांडिया, रांगोळी, संगीत खुर्ची, वेशभूषा, डान्स आदि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच लकी ड्रॉ चेदेखील आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, व्यापारी बॅँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, मविप्र सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, आर्किटेक्ट उन्मेष गायधनी, साहेबराव मोरे, वसंतराव बोराडे, राजाभाऊ बोरसे, शंकर बोराडे, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब डेरले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लकी ड्रॉमधून सचिन निकम, श्रीराम कदम, गौरी घडुसे, गौरव शिरसाठ, शुभम पगारे यांच्यासह विविध स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अ‍ॅड. सुनील बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन बबलू बोराडे व आभार प्रमोद वडजे यांनी मानले. यावेळी पंकज जाधव, प्रेम गायकवाड, प्रकाश बोराडे, श्रीराम बोराडे, राजू डहाळे, भगीरथ वाळुंज, नरहरी कसबे, रामू बोराडे, रोशन बेझेकर, महेश राजगुरू, रिता त्रिपाठी, पुष्पाताई वडजे, जयश्री गोराडे, उषा मेमाने, आशा कुमावत, मनोज बोराडे, प्रवीण जगताप, रवि पोरजे, अवधुत पगारे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dandiya contest prize distribution