शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळच्या साफसफाईला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:08 IST

रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाईसाठी केली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही कामगारांकडून दांडी मारण्याचा प्रकार सुरूच आहे.

नाशिक : रात्रपाळीच्या सफाईच्यावेळी बव्हंशी सफाई कामगार कामावरच हजर राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेऊन सुमारे ४२० कामगारांची नियुक्ती सायंकाळच्या म्हणजे ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाईसाठी केली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही कामगारांकडून दांडी मारण्याचा प्रकार सुरूच आहे. पंचवटी विभागात मंगळवारी (दि.३) ७० पैकी अवघे ८ कर्मचारी हजर असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने संबंधितांचे वेतन कापण्याचे आदेश दिले आहेत. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रात्रपाळीची सफाई सुरू होती. सकाळच्या सत्रात चार तास काम केल्यानंतर रात्री ६ ते १० या वेळेत चार तास काम सफाई कामगारांकडून करून घेतले जायचे. रात्रपाळीच्या सफाईवर महापालिकेकडून दरमहा ५० लाख रुपये अतिरिक्त खर्च व्हायचा. मागील पंचवार्षिक काळात विद्यमान सभागृहनेता दिनकर पाटील यांनी रात्रपाळीच्या सफाई कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालत असल्याचे निदर्शनास आणून देत सदर सफाई कायमस्वरूपी बंद करून टाकण्याची मागणी केली होती. रात्रपाळीत अनेक कामगार प्रत्यक्ष सफाई करतच नसल्याचे तर काही कामगारांकडून बदली कामगार पाठविले जात असल्याची तक्रारही पाटील यांनी केली होती. वारंवार मागणी करूनही रात्रपाळीची सफाई बंद होत नव्हती. अखेर, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर बेशिस्त सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारला आणि रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सहाही विभागातील रात्रपाळीची सफाई बंद करून संबंधित कामगारांची नियुक्ती सायंकाळी ४ ते ८ या वेळेत व्यापारी पेठांतील सफाई कामांसाठी करण्यात आली. परंतु, सायंकाळच्या सफाईलाही अनेक कामगार दांडी मारत असल्याचे निदर्शनास येत आहे. पंचवटी विभागात मंगळवारी केवळ आठच कामगार हजर असल्याचे निदर्शनास आल्याने उर्वरित विनापरवानगी गैरहजर कामगारांचे वेतन कापण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नागरिक खूश, कामगार नाखूशमहापालिका आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या सफाई कामगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने शहरात आता ठिकठिकाणी वेळेत सफाई होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, यापूर्वी ज्या कामगारांकडून व्यवस्थेला वेठीस धरून गैरफायदा उठविला जात होता, त्यांची कमालीची कोंडी झाली आहे. त्यामुळे, कामाच्या वेळा बदलून घेण्यासाठी विभागीय अधिकाºयांसह प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समजते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका