पेठ -नवरात्रोत्सवाला पेठ सुरगाणा सह गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या डांग, बलसाड जिल्हयातही उत्साहाने प्रारंभ झाला असून गावागावातून आई सप्तशृंगी देवीच्या पालख्या घेऊन पायी दिंडया गडाकडे मार्गस्थ झाल्या आहेत.आदिवासी भागातून हजारो भाविक मजल दरमजल करत खांद्यावर भगव्या पताका व डोईवर पालखी घेऊन सप्तशृंगी गड गाठत असतात. नवरात्राच्या पहिल्या माळेपासून भाविकांचे जथे गडाकडे झेपावतांना दिसून येत आहेत. यामध्ये पुरु षांबरोबर महिलांची वाढती संख्या नव्या भाविकांना उमेद देणारी ठरत आहे.पेठला गरबा चा रंगोत्सवयेथील सप्तशृंगी मंदिर परिसरात दररोज हजारो भाविक रात्रीचा एकत्र येऊन गरबाच्या तालावर ठेका धरत असतात . पेठ सह गुजरात राज्यातील भाविकांचे हे श्रध्दास्थान असून जागृत देवस्थान म्हणून या देवीला रानदेवी असेही संबोधले जाते.
आदिशक्तीचा जागर करत दिंडया सप्तशृंगी गडाकडे मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:32 IST
पेठ -नवरात्रोत्सवाला पेठ सुरगाणा सह गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या डांग, बलसाड जिल्हयातही उत्साहाने प्रारंभ झाला असून गावागावातून आई सप्तशृंगी देवीच्या पालख्या घेऊन पायी दिंडया गडाकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
आदिशक्तीचा जागर करत दिंडया सप्तशृंगी गडाकडे मार्गस्थ
ठळक मुद्देमहाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात नवरात्र उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मराठी माणसाचे आवडते वाद्य म्हणजे सांबळ व पावरी . तर गुजराती भावीकांचा गरब्याच्या तालावर धरलेला ठेका यांचे संमिश्र मिलन या उत्सवात पहावयास मिळते.