नृत्य स्पर्धेत विवाहितांचा जलवा

By Admin | Updated: January 23, 2016 23:27 IST2016-01-23T23:25:38+5:302016-01-23T23:27:06+5:30

ट्विस्ट टू डान्स : नवज्योती महिला मंडळाचा उपक्रम

Dance competition marriages | नृत्य स्पर्धेत विवाहितांचा जलवा

नृत्य स्पर्धेत विवाहितांचा जलवा

नाशिक : संसारात रमलेल्या, परंतु आपल्यातील कलागुणांचे विस्मरण न होऊ देणाऱ्या विवाहित महिलांनी नृत्य स्पर्धेत आपला जलवा दाखविला. कुणी फ्यूजनवर ठेका धरला, तर कुणी सामाजिक संदेश देत स्पर्धेत रंग भरले. म्हसरूळ येथील नवज्योती महिला मंडळाने आयोजित केलल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.
महाकवि कालिदास कलामंदिरात रंगलेल्या या अनोख्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार बाळासाहेब सानप, उपवनसंरक्षक अनिता पाटील आणि मिस इंटरनॅशनल वर्ल्ड वाइड क्विन नमिता कोहोक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी म्हसरूळ परिसरात नवज्योती महिला मंडळाच्या कार्यालयासाठी इमारत बांधकामाकरिता आमदार निधीतून मदत करण्याची घोषणा केली, तर अनिता पाटील आणि नमिता कोहोक यांनी विवाहित महिलांच्या कलागुणांना संधी देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. उद्घाटन सत्रानंतर जेनेनीस डान्स ग्रुप, पीएम रंगीला, पल्लवीज डान्स ग्रुप, सिक्स एन्जल, नवचैतन्या, शक्ती ग्रुप, हॅपी ग्रुप, रॉकस्टार ग्रुप, डायमंड क्वीन, रंगीला ग्रुप, नवदुर्गा महिला मंडळ, सुपर मॉम्स् गु्रप, डी-व्हायरस ग्रुप, यारिया ग्रुप, स्वयंसिद्धा आणि आदिशक्ती ग्रुपने विविध गीतांवर नृत्य सादर केले. स्पर्धेत व्यवसायाने शिक्षक, डॉक्टर असलेल्या महिलांही सहभागी झाल्या होत्या. परीक्षक म्हणून तमन्ना नायर, वृषाली चौधरी, स्वाती सोनगिरे यांनी काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्ष सुजाता कासलीवाल यांनी केले. भावना कासलीवाल यांनी आभार मानले. यावेळी स्वाती माडीवाले, शिवानी ओझरकर, प्रतीक्षा होशिंग, मंजूषा कुलकर्णी, सुषमा काला, भावना कासलीवाल, प्रतीक्षा नातू, सुषमा गांधी, सुजाता कुलकर्णी, संगीता बिटोडे, मंगला शेटे आदि उपस्थित होते. दरम्यान, या स्पर्धेत प्रथम पारितोषिक डी-व्हायरस ग्रुप, द्वितीय- डायमंड क्वीन, तृतीय- नवचैतन्य ग्रुप यांनी मिळविले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक यारीया ग्रुपला देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Dance competition marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.