शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात कांदा, बटाटा पिकासह द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 6:50 PM

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गारांसह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, बटाटा पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा तडाखा : गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गारांसह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, बटाटा पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. अशातच सायंकाळी अचानक वादळ व पावसाला सुरुवात झाली. काही प्रमाणात गारांही पडल्या. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवडे, विंचुरीदळवी, घोरवड, पांढुर्ली, आगसखिंड, बेलू गावांमध्ये शेकडो एकरावर बटाटा व कांदा लागवड झालेली आहे. पावसामुळे कांदा व बटाटा पिकासह द्राक्ष बागांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले. कांदा व बटाटा पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.वातावरण बदलाने सुरुवातीपासूनच कांदा व बटाट्याला महागडी कीटकनाशके शेतकऱ्यांनी फवारली होती. त्यातच अवकाळीचा तडाखा, बाजारभावाची शाश्वती नाही अशा संकटात शेतकरी सापडला आहे. जगावे तरी कसे असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील पिकांसाठीचे नियोजन कोलमडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना धीर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिलसततच्या वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांदा व बटाटा पीक हे पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. बटाटा बियाणे शेतकऱ्यांनी चढ्या दराने खरेदी केले होते. कांदा रोप बनविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. बटाटा पिकाला अगदी लागवडीपासून वातावरणाचा फटका बसला होता. लागवडीच्या वेळेलाही अवकाळीचा सामना पिकांना करावा लागला होता. कसेबसे पीक हातात येण्याची आशा होती, परंतु अवकाळीने ती धुळीस मिळविली. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती