गिरणा नदीपात्रातील पाईपलाईनचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 00:00 IST2021-06-10T23:57:51+5:302021-06-11T00:00:40+5:30
लोहोणेर : लोहोणेर-ठेंगोडा गावांदरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या पाईपलाईन वाळूमाफियांनी तोडल्याने गुरुवारी (दि. १०) दुपारी लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीसपाटील यांनी पाईपलाईनची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

गिरणा नदीपात्रात तुटलेल्या पाईपलाईनची पाहणी करताना लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शेतकरी.
लोहोणेर : लोहोणेर-ठेंगोडा गावांदरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या पाईपलाईन वाळूमाफियांनी तोडल्याने गुरुवारी (दि. १०) दुपारी लोहोणेर-ठेंगोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीसपाटील यांनी पाईपलाईनची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
गिरणा नदीपात्रात वाळू उपसा जोरात सुरू असून, नदीच्या दोन्हीही काठावरून रात्री मोठ्या प्रमाणावर चोरटी वाळू वाहतूक सुरू असते. यामुळे नदीपात्रातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तुटल्याने ठेंगोडा व लोहोणेर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन या नादुरुस्त व तुटलेल्या पाईपलाईनची पाहणी केली. यावेळी ठेंगोडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण निकम, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे, तुळशीदास शिंदे, कचरदास बागडे पोलीस पाटील, माजी उपसरपंच प्रकाश बागुल, लोहोणेर ग्रामपंचायतीचे सदस्य रतिलाल परदेशी, धोंडू अहिरे, चंद्रकांत शेवाळे, सतीश देशमुख, निंबा धामणे, दिलीप भालेराव, दीपक बच्छाव, रमेश अहिरे, मच्छिंद्र बागुल, हिरामण बागुल, प्रल्हाद बागुल, रामदास उशिरे, पोलीसपाटील लोहोणेर अरविंद उशिरे, योगेश पवार, आदी उपस्थित होते.