कमलधरा धरण फुटल्याने लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:45 IST2020-09-13T00:44:53+5:302020-09-13T00:45:24+5:30
काटवण परिसरातील वळवाडे शिवारात असलेले कळमदरा धरण फुटून १४७ शेतकऱ्यांचे ८७.३१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विद्युतखांब शेतात कोलमडून पडली आहेत. वीस ते पंचवीस विहिरींचे पुराच्या पाण्यामुळे गाळ भरून नुकसान झाले.

मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारातील फुटलेले कमलधरा धरण.
वडनेर : तालुक्यातील काटवण परिसरातील वळवाडे शिवारात असलेले कळमदरा धरण फुटून १४७ शेतकऱ्यांचे ८७.३१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विद्युतखांब शेतात कोलमडून पडली आहेत. वीस ते पंचवीस विहिरींचे पुराच्या पाण्यामुळे गाळ भरून नुकसान झाले. नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला असून, कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकसानीची पाहणी केली.
शुक्रवारी दुपारी अचानक पुराचा लोंढा आल्याने शेतकऱ्यांना संधी न मिळाल्याने गुरे वाहून गेली आहेत. पिंटू घुले या शेतकºयाच्या सात शेळ्या, दोन गायी व एक वासरू वाहून गेले आहेत. वाघखोरे वस्तीवर अण्णा अहिरे यांच्या चाळीत पुराचे पाणी शिरल्याने चाळीतील कांद्याचे नुकसान झाले आहे. अंबासन, वळवाडे, वाघखोरे परिसरातील डोंगररांगांमधून वाहणाºया नाल्यांचे पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या पुरातन धरणाला संततधार पावसामुळे भगदाड पडले. पाण्याच्या लोंढ्यामुळे मका, बाजरी, कांदा पिके अक्षरश: आडवी झाली.
घटनास्थळी स्थानिक स्तर लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता संजय पाटील, ग्रामसेवक हेमंत सावंत, तलाठी मनोज अहिरराव यांनी भेट देऊन पाहणी केली. कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी नुकसानीची पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा कृषी अधिकारी देवरे, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी शेलार कृष्णाभाऊ ठाकरे, घनश्याम
अहिरे, भूषण देवरे, प्रवीण
ठाकरे, बळवंत ठाकरे आदी उपस्थित होते.