साकुरी येथे अतिवृष्टीने पिकांसह घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 22:56 IST2021-09-28T22:56:21+5:302021-09-28T22:56:59+5:30

शिवरोड (मालेगाव) : साकुरीसह परिसरात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. नदीला लागून असलेल्या घरामध्ये पाणी शिरले आहे.

Damage to houses with crops due to heavy rains at Sakuri | साकुरी येथे अतिवृष्टीने पिकांसह घरांचे नुकसान

मालेगाव तालुक्यातील साकुरी येथे अतिवृष्टीमुळे शेतात साचलेले पाणी. 

ठळक मुद्देशासनाकडून भरपाई मिळत नसल्याची तक्रार

शिवरोड (मालेगाव) : साकुरीसह परिसरात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. नदीला लागून असलेल्या घरामध्ये पाणी शिरले आहे.

साकुरी गावची गाव नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. कांदा, बाजरी, कपाशी या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तीनदा झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे नदीला आलेला पूर, झालेले नुकसान, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान अजून मिळालेले नाही, नुसता पंचनामा केला जातो, परंतु शासनाकडून भरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे.
 

Web Title: Damage to houses with crops due to heavy rains at Sakuri