वडेलला विहीर ढासळून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:56 IST2019-12-14T00:56:17+5:302019-12-14T00:56:34+5:30

वडेल येथील खाकुर्डी रस्त्यावरील गट नंबर ९३३ मधील विहीर बुधवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक ढासळल्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.

Damage to the elder by collapsing the well | वडेलला विहीर ढासळून नुकसान

वडेलला विहीर ढासळून नुकसान

वडनेर : वडेल येथील खाकुर्डी रस्त्यावरील गट नंबर ९३३ मधील विहीर बुधवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक ढासळल्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.
वडेल शिवारात खाकुर्डी रस्त्यालगत रामेश्वर सावळे यांची शेती आहे. त्यांनी शेतजमीन सिंचनासाठी आपल्या मालकीच्या गट नंबर ९३३ मध्ये विहिरीचे पक्के बांधकाम केले होते. बुधवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही विहीर अचानक कोसळली. विहिरीच्या कठड्याचे (रींग) बांधकाम अचानक ढासळल्याने विहीर बुजली आहे. यात विहिरीवर असलेली अकरा हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर, पाच हजार रुपयांची वायर व पाइप तसेच सिमेंटच्या पक्क्या कड्यांचे अंदाजे एक लाख दहा हजार रुपयांचे बांधकाम असे एकूण एक लाख सव्वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा वडेल सजाचे तलाठी अमित साने यांनी केला.

Web Title: Damage to the elder by collapsing the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.