देवळा तालुक्याच्या पुर्व भागात अतीपावसाने शेतीपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:44 IST2020-09-26T22:45:57+5:302020-09-27T00:44:11+5:30
उमराणे : गेल्या पंधरवाड्यापासुन देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील गावात अतीपावसाने मका, बाजरी, कांदे आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहणी प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी दिले असुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उमराणे येथे शेतात साचलेल्या पाण्यातून काही अंशी वाचलेला मका जमा करताना नुकसानग्रस्त शेतकरी.
उमराणे : गेल्या पंधरवाड्यापासुन देवळा तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील गावात अतीपावसाने मका, बाजरी, कांदे आदी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहणी प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी दिले असुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरवाड्यापासुन तालुक्याच्या पुर्व भागातील उमराणेसह परिसरातील सांगावी,कुंभार्डे, चिंचवे, गिरणारे, तिसगाव, वर्हाळे, खारीपाडा आदी गावांमध्ये अतीपावसाने मका, बाजारी, तुर, लाल पावसाळी कांद्याचे रोपे, लाल कांदे आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्णत: वाया जाऊ लागल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी होताच आमदार राहुल अहेर यांच्यासह देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजवळ, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, तलाठी एस.एस.पवार, माजी जि.प.सदस्य प्रशांत देवरे, शेतकी संघाचे संचालक संदिप देवरे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख भरत देवरे आदींनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहणी दौरा केला. तसेच शेतकर्यांच्या व्यथा जाणुन घेतल्या. यावेळी राहुल अहेर यांनी नुकसानीबाबत शासनास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असुन तहसीलदार दत्तात्रय शेजवळ यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतपिकांचे लवकरच पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतीपावसाने चार एकर मका शेतात पाणी साचल्याने शेत उपळले आहे.परिणामी संपुर्ण मका पिक वाया गेल्याने संकट ओढावले आहे. शासनाने पंचनामे करुन तात्काळ नुकसानभरपाई मिळवुन द्यावी. -बाळासाहेब देवरे, नुकसानग्रस्त शेतकरी