पावसाने मक्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:45 IST2021-07-12T18:45:02+5:302021-07-12T18:45:02+5:30
लासलगाव : सलग दोन ते तीन तास चांगल्या प्रकारे पावसाने हजेरी लावल्यामुळे मका, सोयाबीन, बाजारी पिकांबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतीकामांना वेग मिळणार आहे.

पावसाने मक्याचे नुकसान
ठळक मुद्देपावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी (दि.१२) दिलासा मिळाला.
लासलगाव : गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी (दि.१२) दिलासा मिळाला. लासलगावसह निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक, ब्राह्मणगाव, टाकळी,निमगाव वाकडा ,कोटमगाव, मरळगोईसह परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. सलग दोन ते तीन तास चांगल्या प्रकारे पावसाने हजेरी लावल्यामुळे मका, सोयाबीन, बाजारी पिकांबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेतीकामांना वेग मिळणार आहे.
फोटो- १२ लासलगाव रेन