पाटोदा परिसरात वादळी पावसाने नुकसान, अंगावर भिंत पडून चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:26 IST2020-06-17T22:02:05+5:302020-06-18T00:26:46+5:30
पाटोदा : परिसरात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने घर अंगावर कोसळल्याने शिवाजी बोरनारे यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगेश केंगे यांचे सुमारे दोन एकर शेतीचे पॉलिहाउस उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.

पाटोदा परिसरात वादळी पावसाने नुकसान, अंगावर भिंत पडून चार जखमी
पाटोदा : परिसरात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने घर अंगावर कोसळल्याने शिवाजी बोरनारे यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगेश केंगे यांचे सुमारे दोन एकर शेतीचे पॉलिहाउस उडून गेले तर काही शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने नुकसान झाले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त बोरनारे कुटुंबीयांना उपचारासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. पाटोदा सजाचे तलाठी सुनील तळवे यांनी नुकसानीचे पंचनामे करून तहसीलदारांना अहवाल सादर केला.
--------------
महिलेस गंभीर दुखापत
पाटोदा येथील शिवाजी पुंजा बोरनारे यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून शेतात जाऊन पडले, तर पत्रे उडाल्यानंतर संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. पत्रे उडाल्याने घरातील काही माणसे घरातील पलंगाखाली लपले मात्र संपूर्ण भिंत पलंगावर पडल्याने लपलेली माणसे दबली गेली. त्यात शिवाजी बोरनारे, सविता बोरनारे, गोरख बोरनारे व लहान बालिका निर्जला बोरनारे जखमी झाले असून, या सर्वांना येवला येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविता बोरनारे यांच्या हात पाय व तोंडाला मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना मुका मारदेखील लागला.
-----------------
१ पाटोदा परिसरात सुमारे दोन तास झालेल्या या वादळी पावसाने विजेच्या तारा तुटून पडल्या. अनेक झाडे व विद्युत खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. कैºया पडल्याने मोठे नुकसान झाले.
२ वाºयाचा वेग प्रचंड असल्याने मंगेश श्रीकांत केंगे यांच्या गट २३५ मध्ये असलेले पॉलिहाउस वादळाने जमीनदोस्त झाले असून, त्यांचे सुमारे पंधरा ते अठरा लाखांचे नुकसान झाले आहे. ताराबाई अशोक बैरागी यांच्याही पॉलिहाउसचे सुमारे बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे.
३ परिसरातील राजेंद्र विश्वनाथ शिंदे, बबन माणिक जाधव या शेतकºयांच्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या असून साहेबराव आहेर, जानकीदास बैरागी यांच्या डाळिंबबागांचे नुकसान झाले आहे. सिंधूबाई बैरागी, अशुदुला चौधरी, गीताबाई आहेर यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. ज्ञानेश्वर जाधव, विठाबाई शेटे यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून गेल्याने संपूर्ण कांदा भिजून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.