त्र्यंबकेश्वर तहसिल कार्यालयात कारवर झाड कोसळून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:45 IST2020-08-13T19:40:53+5:302020-08-13T23:45:11+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर निलगिरीचे झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले आहे.

त्र्यंबकेश्वर तहसिल कार्यालयात कारवर झाड कोसळून नुकसान
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर निलगिरीचे झाड कोसळल्याने कारचे नुकसान झाले आहे.
हरसुल येथील दिलीप सुकदेव घोटेकर हे गुरु वारी (दि.१३) कामानिमित्त येथील तहसील कार्यालयात आले असता त्यांनी आपली कार (एम एच १५ जी एक्स ५६३९) आवारात उभी केली होती. सध्या त्र्यंबक परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस सुरु आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार वाºयामुळे निलगिरीचे झाड उन्मळुन कारच्या पाठीमागील बाजुवर पडले.
सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने कोणास दुखापत झाली नाही. झाड पडल्याचा आवाज झाल्यानंतर कार्यालयातील कर्मचारी परिसरातील नागरीक घटनास्थळी धावले. निलगिरीचे झाड कारच्या मागील भागावर पडल्याने कारचे काही प्रमाणात नुकसान झाले.
निवासी नायब तहसिलदार रामकिसन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी ज्ञानेश्वर डोंगरे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यामध्ये एक लाख रु पयांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
सध्या परिसरात मुसळधार पावसासह वादळी वारे वाहात असल्याने नागरीकांनी आपली वाहने झाडाखाली न लावता सुरक्षित ठिकाणी ठेवावीत अशी सुचना तहसीलदार दिपक गिरासे यांनी केली आहे. (फोटो १३ कार)