मालेगावी गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 01:01 IST2021-09-10T01:00:37+5:302021-09-10T01:01:30+5:30
मालेगाव येथील संगमेश्वर भागातील अंतिम भूखंड क्रमांक ९६ अ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत उपलोकायुक्त यांचा चौकशी आदेश व आदेशानंतर झालेला चौकशीचा अहवाल तसेच विविध शासकीय स्तरावरील झालेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल येथील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.

मालेगावी महात्मा गांधी पुतळ्याजवळ विविध मागण्यांसाठी आंदोलन करताना सुरेश पवार, अब्दुल कादीर, अब्दुल शकुर, धुडकू माळी, ओंकार वाघ, राजू पगारे, गिरीष जाधव आदी.
मालेगाव : येथील संगमेश्वर भागातील अंतिम भूखंड क्रमांक ९६ अ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत उपलोकायुक्त यांचा चौकशी आदेश व आदेशानंतर झालेला चौकशीचा अहवाल तसेच विविध शासकीय स्तरावरील झालेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल येथील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
सर्व आदेशांची अंमलबजावणी होऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले. धरणे आंदोलनात सुरेश पवार, अब्दुल कादीर, अब्दुल शकुर, धुडकू माळी, भिका वाघ, राजू पगारे, गिरीष जाधव, दीपक सूर्यवंशी, फिरोज शेख, नासिर ताज मोहंमद, विजू हिरे, फारूक मोहंमद आदींनी सहभाग घेतला.