दलाई लामा आज नाशकात
By Admin | Updated: January 3, 2015 01:42 IST2015-01-03T01:41:58+5:302015-01-03T01:42:23+5:30
दलाई लामा आज नाशकात

दलाई लामा आज नाशकात
नाशिक : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा हे तब्बल बावीस वर्षांनंतर उद्या (दि. ३) नाशकात येत असून, शहरात आयोजित धर्मनिरपेक्षता नीती परिषदेत त्यांचे जाहीर प्रवचन होणार आहे. इंडो-तिबेटीयन मंगल मैत्री संघाच्या वतीने पाथर्डी फाटा येथील हॉटेल ज्युपिटरमध्ये ही परिषद होणार आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या धार्मिक उन्मादाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता दलाई लामा हे ओझर विमानतळावर दाखल होतील. तेथून ते मोटारीद्वारे कार्यक्रमस्थळी पोहोचतील. सकाळी ९.३० वाजता त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. त्यानंतर ते ‘जागतिक धर्मनिरपेक्षता नीतितत्त्वांबद्दल भगवान बुद्धांचे विचार’ या विषयावर दोन तास मार्गदर्शन करतील. दुपारी १ ते २.३० या वेळेत विविध धर्मगुरू, विचारवंतांच्या उपस्थितीत विचारमंथन होणार असून, त्यातही दलाई लामा उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी सन १९९२ मध्ये दलाई लामा हे नाशकात आले होते. फोटो आहे : आर फोटोवर ‘दलाई लामा’ नावाने सेव्ह.