दादा भुसे समर्थकांच्या आशा पल्लवित मंत्रिमंडळ विस्तार : जिल्'ाला स्थान?
By Admin | Updated: December 3, 2014 01:37 IST2014-12-03T01:37:27+5:302014-12-03T01:37:54+5:30
दादा भुसे समर्थकांच्या आशा पल्लवित मंत्रिमंडळ विस्तार : जिल्'ाला स्थान?

दादा भुसे समर्थकांच्या आशा पल्लवित मंत्रिमंडळ विस्तार : जिल्'ाला स्थान?
नाशिक : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी सेनेच्या आमदारांमध्ये चढाओढ लागलेली असतानाच, मालेगावचे आमदार दादा भुसे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. स्वत: भुसे हेदेखील उत्सुक असून, रात्री उशिरा त्यांनी तातडीने मुंबई गाठली. तीन वेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केलेल्या दादा भुसे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाने नाशिक जिल्'ाला प्रतिनिधित्व मिळणार आहे. शिवसेनेच्या सत्तेतील सहभागात सात राज्यमंत्रिपदे देण्याची तयारी भाजपाने दर्शविली असून, उत्तर महाराष्ट्रातून फडणवीस सरकारमध्ये एकमेव एकनाथ खडसे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भाजपाच्या अन्य कोणा आमदाराला व त्यातल्या त्यात नवख्या असलेल्या आमदाराला विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर भाजपाकडून मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची तशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद वाढविण्याची नामी संधी मंत्रिमंडळ विस्ताराने मिळणार असून, दादा भुसे यांची वर्णी लागण्याची त्याचमुळे अधिक शक्यता वाढीस लागली आहे. भुसे यांनी राजकारणातील एका मोठी परंपरा लाभलेल्या घराण्याचा पराभव करून राजकारणात व विधिमंडळात प्रवेश केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी भुसे हे योग्य ठरू शकतात, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. मंगळवारी दुपारनंतर यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली असून, स्वत: भुसे यांनीदेखील मंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेतील असे सांगितले; मात्र संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर रात्री त्यांनी तातडीने मुंबई गाठली.