दरोडा टोळीतील संशयितांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:27 IST2019-03-17T00:21:08+5:302019-03-17T00:27:32+5:30

नाशिकरोड परिसरात असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडदेनगर येथे दरोडा टाकून आडगाव शिवारातील तपोवन परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला न्यायालयाने सोमवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Dacoity gang police suspects | दरोडा टोळीतील संशयितांना पोलीस कोठडी

दरोडा टोळीतील संशयितांना पोलीस कोठडी

पंचवटी : नाशिकरोड परिसरात असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोडदेनगर येथे दरोडा टाकून आडगाव शिवारातील तपोवन परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला न्यायालयाने सोमवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीला आडगाव पोलिसांनी तपोवन ते बळीमंदिर दरम्यान असलेल्या रुक्मिणी लॉन्ससमोर धारदार शस्त्रास्त्रे, मिरची पूड, तसेच दरोड्याच्या साहित्यासह ताब्यात घेऊन त्यांनी खोडदेनगरला टाकलेल्या दरोड्यातील मुद्देमाल, चारचाकी असा ६ लाखांचा ऐवज जप्त केला होता. टोळीतील काही संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले होते. पोलिसांनी या प्रकरणात तामिळनाडू येथील भाल्या कृष्णा हरिजन, आनंद विजय भंडारे, जावेद रसूल पिंजारी, विजय वाल्मीक गायकवाड (सर्व राहणार पिंपळगाव बसवंत, ता. निफाड), औरंगाबाद येथील समीर हसन शाह आणि मंजूर हरसूल पिंजारी यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Dacoity gang police suspects