शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील भाजपेत्तर सरकारमुळे मिळाले दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचे धागेदोरे : कन्हैया कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 21:33 IST

महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचल्याचा दावा आॅल इंडिया स्टुडंट फे डरेशनचे नेते (एआयएसएफ) कन्हैया कुमार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील तपास यंत्रणाही सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप कन्हैया कुमार यांनी केला आहे

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील तपास यंत्रणेवर सरकारचा दबावसरकार भितीचे वातावरण निर्माण करीत आहे कन्हैया कुमारचा भाजपा सरकारवर आरोप

नाशिक : महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचल्याचा दावा आॅल इंडिया स्टुडंट फे डरेशनचे नेते (एआयएसएफ) कन्हैया कुमार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील तपास यंत्रणाही सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप करतानाच क न्हैया कुमार शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. २०) भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. देशात लोकशाही व तर्कशुद्ध विचार मांडणाºयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. जाहीररीत्या कोणी भूमिका मांडत असल्यास त्यांच्यावर हल्ले होतात किंवा हत्या केली जाते. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेशसारख्या व्यक्तींसोबतही हाचप्रकार घडला. परंतु तपास यंत्रणांवर भाजपा सरकारचा दबाव असल्याने महाराष्ट्र पोलिसांसह सीबीआयला या प्रकरणाचा तपास पाच वर्षांत लावता आला नाही. मात्र कर्नाटकमध्ये गैरभाजपा सरकार असल्याने गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासातून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकºयांपर्यंचे धागेदोरे मिळाल्याने दाभोलकऱ्यांच्या मारेकºयांना अटक झाल्याचा दावा कन्हैया यांनी केला आहे. सरकार तपास यंत्रणा, माध्यमे तसेच न्याययंत्रणांना कमकुवत करीत असल्याचे सांगत न्यायमूर्ती लोया प्रकरणातही याचाच प्रत्यय आला. दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा बंदोबस्त असतानाही गोळ्या चालविणाºयांनाही सरकारचे संरक्षण असून, उमर खालिदवरील हल्ल्याचा उल्लेख करून एवढ्या बंदोबस्तात गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित करताना हा सत्तेविरोधात बोलणाºयांचा आवाज दाबण्याचा आणि देशवासीयांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कन्हैयाने केला आहे. देशात जमावाच्या मारहानीचे प्रकार वाढत आहे. अशी मारहाण करणाºयांनाही सरकारचेच संरक्षण असून, देशात भीतीचे वातावरण पसरविण्यासाठी असे प्रकार घडवले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे. 

निवडणुका व्यक्तीकेंद्रित करण्याचा घाटलोकशाहीत होणारी निवडणूक ही पंतप्रधान निवडण्यासाठी नव्हे, तर संसदेचे सदस्य निवडण्यासाठी होते. परंतु, भाजपाने निवडणुका व्यक्तीकेंद्रित करण्याचा घाट घातला असून, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलनात्मक लढत रंगवली जात आहे. प्रत्यक्षात निवडणूक लोकसंख्येचे ४५४ सदस्य निवडण्यासाठी होणार आहे, यापासून संपूर्ण देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी हा घाट घातला जात असल्याची प्रतिक्रिया कन्हैया यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारNashikनाशिकNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरBJPभाजपाdemocracyलोकशाही